समाज विकासातील नवीन प्रवाह

Authors

  • प्रा. विलास सोमाजी पवार सहा. प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, आदर्श महाविद्यालय, हिंगोली

DOI:

https://doi.org/10.17605/OSF.IO/XRU4B

Keywords:

समाज विकास

Abstract

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुन्या, पारंपरिक समाजाऐवजी एक नवीन विज्ञानदृष्टीसंपन्न, बुद्धिवादी आणि समतापूर्ण समाज स्थापित होईल, अशी आकांक्षा होती. ज्या ताकदीने आणि उमेदीने देश गुलामगिरीविरुद्ध लढला. त्याच ताकद व उमेदीने समाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि समाजात फूट पाडणाऱ्या शक्ती विरुद्ध लढण्यासाठी तत्पर होईल असेही वाटत होते. पण दुर्दैवाने हे स्वप्न आज पर्यंत पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत. राष्ट्राच्या आंतरिक व बाह्य एकात्मतेवर सतत आक्रमणे होत आहेत. अनाचार अत्याचार आणि भ्रष्टाचाराने देश पोखरून निघत आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनातून नीती नियमांचे उच्चाटन होत आहे. प्रबोधनाची इतकी दीर्घ परंपरा लाभलेला भारतीय समाज पुरेसा संपन्न झालेला नाही. विविधतेने नटलेल्या या भारतीय समाजाचे वेगवेगळे गट कधी भाषेच्या, कधी प्रदेशाच्या तर कधी धर्माच्या प्रश्नावर इतकी टोकाची भूमिका घेत आहे.त्यामुळे देश विभक्त होतो की काय असे वाटू लागते.

                भारताचा संवेदनशील स्वभाव आणि समन्वयवादी भूमिका सदैव राहिलेली आहे.परस्परभिन्न विचारसरणी, आचार पद्धती, धर्म, पंथ, जाती यात वेगळेपण असले तरी एकवाक्यता  अधिक प्रमाणात जाणवते.अतिशय संथ असली तरी परिवर्तनाची प्रक्रिया फार पूर्वीपासून या समाजात निरंतर चाललेली आहे.ब्रिटिश राजवटीपासून आज पर्यंत सामाजिक बदलाचे प्रयत्न वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आणि समाजसेवकांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे. आपल्या देशाची राज्यघटना एक आदर्श घटना असून ती समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारी असून मानवी स्वातंत्र्याचे पूर्णतः रक्षण करणारी आहे. भारतामध्ये आता जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आहे. विज्ञान संस्कृतीचाही वेगाने प्रचार व प्रसार होत असून समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा हळूहळू कमी होत आहे. नव समाजाच्या सामाजिक पुनर्बांधणीसाठी परिवर्तनाची प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने समाजात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून येत आहेत. सोबतच अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होत आहेत शेतकरी, कामगार, महिला इत्यादींचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वैज्ञानिक शोधांनी जगात नवी विज्ञान संस्कृती जन्मालाआलीे.समताधिष्ठित असा समाज अस्तित्वात येण्यासाठी सामाजिक पुनर्बांधणी होण्याची गरज आहे. तेव्हा आपणास समाज विकासातील काही नवीन घटकांचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल.

Downloads

Download data is not yet available.

References

१) भारतीय समाज: वादातीत विषय आणि समस्या ------ प्रा एस एन गंदेवार

२) भारतातील सामाजिक कल्याण: प्रशासन व समाजकार्य ----- प्रा लक्ष्मण कोत्तापल्ले

३) भारतीय सामाजिक विचारवंत--- डॉ. दा धो काचोळे

४) भारत में समाज: संरचना येवं परिवर्तन ----- प्रो एस एल गुप्ता, डॉ डी डी शर्मा

५) भारतीय समाज समकालीन समस्या---- डॉ धारवाडकर, डॉ भालेराव

६) भारतातील सामाजिक चळवळी ---प्रा सिद्धेश्वर कोळे, प्रा संग्राम आंदे

७) ग्रामीण समाजशास्त्र ---- डॉ. दा धो काचोळे

८) भारतीय सामाजिक समस्या ----- डॉ. गंदेवार

Downloads

Published

2021-06-15

How to Cite

[1]
“समाज विकासातील नवीन प्रवाह”, IEJRD - International Multidisciplinary Journal, vol. 6, no. 3, p. 6, Jun. 2021, doi: 10.17605/OSF.IO/XRU4B.

Similar Articles

You may also start an advanced similarity search for this article.